Facebook

Wednesday, 25 December 2013

आठवण ..सगळ्यांनाच येते...मोठ्यांना लहानपणाची अन लहाणांना मोठ्यांची...बाबांना आपल्या शाळेची... अन पिंकी ला आपल्या आजोबांची...आईला आपल्या आबांची अन आबांना आपल्या चिऊ ची...... कोणाला आपल्या ताईची तर ताईला माहेरच्या अंगणातल्या जाईची...हरवलेल्या आपल्या मित्रांची... रंगवलेल्या त्या बेधुंद चित्रांची...कट्ट्यावर भरवलेल्या त्या सभांची... आनंदातघालवलेल्या त्या क्षणांची...गर्दीत सुटलेल्या हाथांची... अकारण तुटलेल्या काहीनात्यांची...तिला त्याची अन त्याला तिची...आठवण...एक अशी गोष्ट जी सगळ्यांकडे अगदी भरभरून असते...आठवणींच्या राज्यात सगळेच श्रीमंत.. कारण आठवणी सगळ्यांना समृद्धच करतात...हवेला गंध नसतो..पाण्याला रंग नसतो..अन आठवणींना ... आठवणींना 'अंत' नसतो!!

No comments:

Post a Comment